Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगर व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक टेहल्यानीसुटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी प्रा. सयाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी प्रा. शरद गायकवाड , दत्तात्रय पाटीलस्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंना भाजपकडून एबी फॉर्म, सोमवारी अर्ज भरणार!! शरद लाड, विजयसिंह मानेंची माघार अन भाजपला पाठिंबा जाहीर!!पुणे पदवीधर - शिक्षक भाजपकडे ! स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंची उमेदवारी घोषित !!मुश्रीफांनी सत्ताधर्म पाळला ! अश्वमेधचा घोडा अर्ध्यावर !! कौस्तुभ गावडेंवर वाढदिवसानिमित्त  शुभेच्छांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांच्यासह मंत्री -खासदार -आमदारांकडून अभिष्टचिंतनशिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटेवीजग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा द्या – अंकुर कावळेशिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे 

जाहिरात

 

वीजग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा द्या – अंकुर कावळे

schedule03 Oct 26 person by visibility 26 categoryउद्योग

कोल्हापूर, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ :* ‘कोल्हापूर जिल्हा महावितरण महसूलाच्या दृष्टीने महत्वाचा असून येथे थोड्या कालावधीकरता खंडित होणारा पुरवठा आर्थिक दृष्ट्या मोठा प्रभाव टाकतो.  तसेच येथील ग्राहक प्रामाणिक असून तो वेळेवर विजबिल भरतो. त्यामुळे जिल्ह्यात अखंड व अधिक दर्जेदार वीजपुरवठा द्या. त्याकरिता प्रत्येक वीजवाहिनीची देखभाल दुरूस्ती करा, आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी ठेवा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक(वितरण) अंकुर कावळे यांनी दिले.

 

महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ऊर्जा शक्ति सभागृहात ‘जिल्ह्यातील संवेदनशील वीज वाहिन्या व त्यावर करावयाची कार्यवाही’ या अनुषंगाने आढावा बैठकीत कार्यकारी संचालक(वितरण) अंकुर कावळे बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना कार्यकारी संचालक(वितरण) अंकुर कावळे पुढे म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ७०६ अकृषक वीज वाहिन्या असून त्यातील ३४ वीज वाहिन्या या संवेदनशील प्रकारात येतात. गेल्या आर्थिक वर्षातील वीज वाहिन्यांवरून मिळणारा महसूल, वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण व त्याचा कालावधी या निकषांवर या वाहिन्यांची निश्चिती मुख्यालयाकडून करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीकरिता वाहिनी बंद करताना ऑनलाईन यंत्रणेत माहिती भरा. देखभालीनंतर या वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्या. याकरिता आवश्यक तेथे एबी स्विच बसवा, कंडक्टर बदला, लाईन क्रिंपिंग करा, शक्य तिथे रिंग फीडिंगचा पर्याय उभा करा, गार्डिग करा. यामुळे महसूल तूट व अपघात यांचे प्रमाण कमी होईल.  या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes