सुटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी प्रा. सयाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी प्रा. शरद गायकवाड , दत्तात्रय पाटील
schedule05 Oct 26 person by visibility 9 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी - : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा), जिल्हा शाखा कोल्हापूरची जनरल कौनसिलची सभा झाली. प्रा. शारदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी जिल्हा शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी् प्रा. सयाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी प्रा शरद गायकवाड, दत्तात्रय पाटील, कार्यवाहपदी महंमदहुसेन पाटील, खजिनदारपदी तुषार घाटगे, सहकार्यवाहपदी संजय चव्हाण, संतोष बाबर यांची निवड झाली. अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून सर्जेराव जाधव काम पाहणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल पाटील यांनी काम पाहिले. या कार्यकारिणी मंडळाच्या बिनविरोध निवडीसाठी आर. जी. कोरबू, प्रकाश कुंभार, विजय देसाई यांचे सहकार्य लाभले.