बाळासाहेब खर्डेकर विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ
schedule22 Sep 22 person by visibility 576 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूरतर्फे (शिवरागिनी), महापालिकेच्या बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिर गंगावेश येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, भेटवस्तू वाटपाच कार्यक्रम झाला. भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष आजम जमादार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शाहरूख गडवाले, सलीम मुजावर, छाया साळुंखे, जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा शीतल पंदारे, उपाध्यक्ष तेजस्वी पार्टे, खजानिस रुपाली तोडकर, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सर्जेराव वाघ, सुभाष मराठे, किरण पाडळकर, कुसुम राजमाने, सुरेश जाधव उपस्थित होते.