Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
च्च थथवसा सामाजिक कार्याचा, ध्यास कागलच्या विकासाचाप्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणीगोकुळतर्फे संचालक चेतन नरके यांचा सत्कारआगामी काळात लष्करामध्ये महिलाराज : कर्नल हेमंत जोशी  प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन१५९ स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मर्यादेचे उल्लंघन, २८ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणीही मॅन धर्मेंद्र यांचे कलापूरशी नाते, कोल्हापुरी पाहुणचाराने भारावले होतेऋतुराज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नगरसेवक भेटले प्रशासकांनामतदार यादीतील हरकतीसाठी मुदतवाढ द्या : शिवसेनेची मागणी

जाहिरात

 

वेस्ट झोन शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिकांचा सुवर्णवेध

schedule24 Oct 24 person by visibility 519 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मध्यप्रदेशातील भोपाळ येथे नुकतीच अकरावी वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सिनिअर गेम्स विभागात कोल्हापूरचे राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज महाडिक यांनी ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले.  भोपाळ येथील एमपी स्टेट शुटींग ऍकॅडमीत आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा या चार राज्यातील नेमबाजांचा सहभाग होता. महाराष्ट्राकडून पृथ्वीराज महाडिक यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सिनिअर गेम्स विभागात पृथ्वीराज महाडिक यांनी ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. तर डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं. या कामगिरीमुळं त्यांची जानेवारी महिन्यात दिल्लीत होणार्‍या राष्ट्रीय शॉर्टगन स्पर्धेसाठी निवड झालीय. त्या स्पर्धेसाठी महासंघाचे पृथ्वीराज महाडिक नेतृत्व करतील. त्यांना प्रशिक्षक सिध्दार्थ पवार, तेजस कुसाळे यांचं मार्गदर्शन मिळाले. तर खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे पाठबळ लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes