नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करा, लाखाचे बक्षीस देऊ -विनायक भोसले
schedule03 Sep 24 person by visibility 235 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी आणि आय टी आय "प्रारंभ-२०२४" या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची संवाद साधताना, ‘ज्या विद्यार्थ्याकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असतील त्या इन्स्टिट्यूट मध्ये सादर करा. निवड झालेल्या संकल्पनेला “एक लाखाची” बक्षीस देऊ.’’असे सांगितले.
बेसिक सायनस विभाग प्रमुख प्रशांत पाटील यांनी इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक आणि आयटीआयच्या सर्व विभागाचे प्रवेश शंभर टक्के झाल्याचे सांगितले. डायरेक्टर, डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या करियर मध्ये सक्सेस मिळवून देण्याचे सर्वस्व जबाबदारी आम्ही स्वीकारतो अशी ग्वाही दिली.
विश्वस्त विनायक भोसले म्हणाले "संजय घोडावत इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ख्यातनाम संस्था आहेच येथे ज्ञानार्जन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जीवन मूल्य आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्यांत येत आहे. .प्रा. रणजीत शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनीत जाखलेकर यांनी आभार मानले. आयटीआय प्राचार्य, प्रा. स्वप्निल ठीकने, प्रा. पूजा पाटील हे उपस्थित होते.