Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाऊसिंगजी रोडवरील जिपच्या मालकीच्या जागा विकसित करा - सभापती सारिका नांदेकर४२७ दूध संस्थेसंबंधी सतेज पाटील गटातर्फे सर्किट बेंचमध्ये याचिकाइनरव्हील क्लबतर्फे बसथांब्याची उभारणी, सोमवारी लोकार्पण सोहळाप्रचाराचा धडाका, सेलिब्रिटीज मैदानात…महामंडळाचे राजकारण जोरातशाहू सांस्कृतिक सभागृह पाडण्याच्या प्रस्तावाला विरोध - नाथाजी पाटीलरविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवारनवीन आयकर कायदा चार्टर्ड अकौंटंटसनी सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा - सीए मंगेश किनारेडॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी  शाहू पुरस्कार जाहीरडीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकनसतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर

जाहिरात

 

शाहू सांस्कृतिक सभागृह पाडण्याच्या प्रस्तावाला विरोध - नाथाजी पाटील

schedule05 Jun 26 person by visibility 16 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शाहू सांस्कृतिक सभागृह पाडण्याच्या प्रस्तावाला विरोध आहे. साठ वर्षाच्या करारान्वये बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर समितीची जागा खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव हा चुकीचा आहे. यामुळे बाजार समितीचा जागेवरील हक्क संपुष्टात येणार आहे. यामुळे बाजार समितीच्या हक्काची जागा व इमारत वाचविण्यासाठी आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिला.

बाजार समितीच्या संचालकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत, शाहू सांस्कृतिक सभागृह पाडण्याबाबतचा ठराव मंजूर झाला. हे सभागृह पाडून बीओटी तत्वावर खासगी संस्थेला देण्याचा विचार आहे. साठ वर्षाच्या भाडेकरारान्वये ही जागा देण्याचा प्रस्ताव आहे. संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयाला काही नेतेमंडळीचा पाठिंबा असल्याचे म्हटले जाते. या प्रस्तावाला बाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळंजू यांनी विरोध केला आहे. त्यापाठोपाठ आता भाजपचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी ही सभागृह पाडण्याच्या प्रस्तावाला विरोध नोंदविला आहे. तसेच आंदोलनाचा इशारा दिला.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes