Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकनसतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टरलिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! शंकरराव माळींना समाजरत्न, कांता माळींना आदर्श माता पुरस्कार ! !राजू मानेंचे प्रशासनाला शहर विकास प्रकल्पासंबंधीचे निवेदनगंगावेश तालमीचे रखडलेले काम मार्गी लावू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महाराष्ट्र कस्ती संघटनेला ग्वाहीसरकारी कमिटीला सरकारच्याच आदेशाचा विसर !  पूररेषेच्या सर्व्हेक्षणाची मुदत उलटूनही समितीची ना बैठक…ना पाहणी, अहवाल तर लांबच ! !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे, उपाध्यक्षपदी संजय शेटे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन ! रंगबहारर संस्थेसह चित्रपट व्यावसायिकही उपस्थित

जाहिरात

 

सतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर

schedule04 Jun 26 person by visibility 26 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : बेंदूर सणानिमित्त व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन सात जून 2026 रोजी करण्यात आले आहे करवीर तालुक्यातील हिंदकेसरी नेर्ली  मळा येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला महिंद्रा ट्रॅक्टर 575 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजन समितीतील व पाचगावचे माजी उपसरपंच नारायण गाडगीळ व गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
अ गट, ब गट, दुस्सा चौसा,   आदत गट अशा चार गटात स्पर्धा होणार आहे. अ गटातील स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला देण्यात येणारे महिंद्रा ट्रॅक्टर 575 बक्षीस आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे.  स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासाठी दोन बुलेट गाडी बक्षीस आहेत तर तृतीय क्रमांकासाठी दोन होंडा यूनिकॉर्न गाडी आहेत.  ब गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला शाईन गाडी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला स्प्लेंडर गाडी व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला एचएफ डीलक्स गाडी हे बक्षीस आहे.
हिंदकेसरी नेर्ली मळा येथे सकाळी नऊ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडी शर्यत शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम पाटील, हमु पाटील, सागर पाटील, गजानन पाटील, पृथ्वीराज पाटील, सर्जेराव पाटील, आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes