Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चंदगड नगरपंचायतसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, आमदार शिवाजी पाटलांच्या उपस्थितीत घोषणाकागलात राजकीय शत्रू बनले मित्र ! नगरपालिकेसाठी हसन मुश्रीफ-समरजितराजे एकत्र ! !काँग्रेस सोडलेल्या माजी नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवणार - आमदार सतेज पाटील अमूलला टक्कर द्यायचे असेल तर गोकुळचे दूध संकलन वाढवा- मंत्री हसन मुश्रीफशिक्षक बँकेच्या मागील संचालकावरील सहा वर्षे अपात्रतेची कारवाई रद्द, जिल्हा उपनिबंधकांचा आदेशमनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपदनगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक ! माजी मंत्री आमदार खासदारांचा समावेशहलगर्जीपणा चालणार नाही, वेळेत काम पूर्ण करा- डेडलाईन पाळा- अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभाजपा - नेते कार्यकर्त्यांचा ढोल ताशावर ठेकालंडनमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, डॉ. संजय पाटील, तेजस पाटलांनी साधला संवाद

जाहिरात

 

चंदगड नगरपंचायतसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, आमदार शिवाजी पाटलांच्या उपस्थितीत घोषणा

schedule17 Nov 25 person by visibility 19 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चंदगड नगरपंचायतच्या २०२५-२९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी उमेदवार जाहीर केले. आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड येथील भाजप कार्यालयात उमेदवारांची घोषणा केली.यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत चंदगडमध्ये परिवर्तन घडवून 'कमळ' फुलवण्याचा निर्धार केला. नगराध्यक्षपदासाठी सुनील सुभाष काणेकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. चंदगड नगरपंचायतसाठी भारतीय जनता पक्षाविरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा लढतीची चिन्हे आहेत. आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजेश पाटील व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी नंदिनी बाभूळकर हे एकत्र आले आहेत.
 दरम्यान चंदगड नगरपंचायतसाठी भाजपने नगरसेवकपदासाठी प्रभागनिहाय सतरा उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अनुक्रमे उमेदवार जयश्री रामा जुवेकर, चेतन व्यंकटेश शेरेगार, अबुजर अब्दुलरहीम मदार, आयेशा समीर नाईकवाडी, शकील कासीम नाईक, तजमुल सलीम फणिबंद, धीरज शामसुंदर पोशिरकर, वैष्णवी सुनिल सुतार, शितल अनिल कट्टी, माधवी उमेश शेलार, सचिन निंगाप्पा नेसरीकर, आसमा असीफ बेपारी, सुचिता संतोष कुंभार, गायत्री गुरुनाथ बल्लाळ, संदीप गोपाळ कोकरेकर, एकता श्रीधन दड्डीकर, सचिन सुभाष सातवणेकर यांचा समावेश आहे. याप्रसंगी गोकुळचे माजी संचालक दिपक पाटील, शांताराम बापू पाटील, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, नामदेव पाटील, विशाल बल्लाळ, लक्ष्मण गावडे,अशोक कदम, प्रताप सुर्यवंशी, सुरेश सातवणेकर, रविंद्र बांदिवडेकर, अमेय सबनीस, सुनिल काणेकर, विजय कडुकर , परशराम गावडे, भारती जाधव, गुरुनाथ बल्लाळ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes