कोल्हापूरच्या विकासाबाबत बुधवारी मुक्तसंवाद
schedule17 Jun 24 person by visibility 356 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या विविध खात्यांच्या कामाविषयी तसेच अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे, विना परवाना यात्री निवास, घरफाळा, कचरा उठाव, बेशीस्त पार्किंग या विषयीच्या नागरीकांच्या तक्रारी आणि कोल्हापूरचा भविष्यातील विकास नेमका कसा असावा या विषयीच्या नागरिकांच्या आणि कोल्हापूरच्या विकासबाबत सातत्याने प्रयत्नशील असलेल्या विविध संस्था संघटनांच्या सूचना संकलित करण्यासाठी मुक्त संवादाचे आयोजन बुधवारी 19 जून रोजी केल्याची माहिती अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदिप उलपे यांनी पत्रकव्दारे दिली आहे.
नागरिक तसेच शहरातील विकासाभिमुख काम करणार्या संंस्था संघटना आणि विविध विषयांचे अभ्यासक यांना कोल्हापूरच्या विकासाबाबत नेमके काय वाटते यासाठीच्या त्यांच्या सूचनांचे संकलन करण्यासाठी मुक्तसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी 11 ते5 या वेळेत शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मुक्त संवाद होणार आहे.या कार्यक्रमात नागरिकांनी तक्रारी , सूचना लेखी स्वरूपात घेवून सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.