Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलनऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शनकोल्हापुरात शुक्रवारी रंगणार प्रिय शिरीष मैफल, विश्वजीत बोरवणकर, पारुल मिश्रांचे सादरीकरणहिल रायडर्सची यंदा अमृतमहोत्सवी पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती मोहीम, चार जुलैला सुरुवातब्राह्मण पुरोहित संघातर्फे पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांचा गुणगौरवपुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलनअजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदलीबांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

जाहिरात

 

पुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलन

schedule24 Jun 26 person by visibility 6 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व समविचारी संघटनेतर्फे सोमवारी, २९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी आयोजित या आंदोलनात शिक्षकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. सेवाज्येष्ठता डावलून कनिष्ठ शिक्षकांना पदोन्नती, २०१३ पूर्वी  नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांसाठी टीइटी / सीटीईटी उत्तीर्णसाठी चाळीस टक्के गुणांची अट करावी. अथवा तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब या राज्याच्या धर्तीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित २०१३ पूर्वीच्या शिक्षकांची स्वतंत्र टीईटी परीक्षा घेण्यात यावी या मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. दुपारी २.३० वाजता आंदोलन होणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes