Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे शाहू जयंतीदिनी रक्तदान शिबीरलाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजली

जाहिरात

 

एकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजली

schedule24 Jun 26 person by visibility 224 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत निधी वाटपातील असमानेतवरुन सदस्यांनी शिक्षण विभाग व प्रशासनाला कोंडीत पकडले. हातकणंगले तालुक्यातील एकाच शाळेला दोन कोटी रुपयांचा निधी मंजुरीवरुन हा विषय उपस्थित झाला. जिल्ह्यातील इतर शाळेतही भौतिक सुविधा, दुरुस्तीची कामे आहेत. निधी वाटपात असमानात कशासाठी असा सवाल सदस्यांनी केला. निधी वाटपात समानता ठेवा अशा सूचना सदस्यांनी केल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन सभेला उपस्थित होत्या.

मंगळवारी, २३ जून २०२६ रोजी स्थायी समितीची सभा झाली. या सभेत २३ विषय पत्रिकेवर होते. सभेला सुरुवात होताच सदस्य संग्रामसिंह कुपेकर, अमर पाटील, शिवाजी जाधव, सुधीर देसाई, महेश् पाटील यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाकडे लक्ष वेधले. शाळा दुरुस्तीवरुन प्रश्न केले. एकाच शाळेला दोन कोटी देण्यामागील प्रयोजन काय असा सवाल केला.  या सभेत जिल्हा परिषद आवारात चार्जिंग स्टेशन उभारणीचा ठराव मंजूर केला. तसेच तत्काळ शाळा दुरुस्ती कराव्यात असे ठरले. कागलकर हाऊसची इमारत हेरिटेज आहे. येथील सर्व कार्यालये स्थलांतर करुन  या इमारतीचा वापर उत्पन्न मिळवण्यासाठी करण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे ठेवण्यात आला होता. मात्र सदस्यांनी त्याला विरोध केला.

जिल्हा परिषदेची एकही जागा यापुढील काळात खासगी संस्था आणि व्यक्तीला देऊ नये अशी भूमिका मांडली. ठेकेदारांची बिले प्रलंबित असल्याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. बजेट अभावी देयके प्रलंबित आहेत, त्यावर ठोस उपाय योजना करण्याच्या सूचना झाल्या. जिल्ह्यात उपअभियंतापदाची बारापैकी आठ पदे रिक्त आहेत हा मुद्दा सदस्यांनी निदर्शनास आणला. त्याच तालुक्यातील कनिष्ठ अभियंत्यांकडे कार्यभार देण्याची सूचना केली. अध्यक्षा खोत यांनी चर्चा करुन निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. सभेला उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes