महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील राजोपाध्येनगर परिसरातील राधाकृष्णनगर येथील राजर्षी शाहू अध्यासन केंद्रास ओंकार वेल्फेअर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक, मुख्य सल्लागार व न्यू कॉलेजचे निवृत्त उप-प्राचार्य प्रा. टी. के. सरगर, न्यू कॉलेजचे माजी विद्यार्थी गोपाळ साळोखे व रोहन डकरे यांनी अध्यासनाचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांना शिवरायांची राजमुद्रा, कट्यार आणि वाघनखे आदींची प्रतिकृती असलेली प्रतिमा भेट स्वरूपात दिली. पवार यांनी अध्यासनातील राजर्षी शाहूंविषयक विविध ग्रंथ संपदेविषयी उपस्थितांना माहिती दिली.