Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

कोल्हापुरात जानेवारीत निमंत्रितांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा

schedule06 Dec 22 person by visibility 1278 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्विमिंग हब फाउंडेशनच्या शवतीने श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पाच ते आठ जानेवारी 2023 या कालावधीत निमंत्रितांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेसाठी टच पॅड या सुविधेचा वापर होणार आहे अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेसाठी 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील जलतरण पटना निमंत्रित केले आहे. आठ ते 21 वयोगटातील मुली व मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरचा पन्नास मीटरचा जलतरण तलाव, टचपॅड व स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना रोग बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सहा डिसेंबर ते 27 डिसेंबर 2022 या या कालावधीत नोंदणी करता येईल. खेळाडू नोंदणी फी सहाशे रुपये व प्रत्येक खेळ प्रकारात शंभर रुपये इतकी असणार आहे. स्पर्धा पाच ग्रुप मध्ये होणार आहे. सर्व ग्रुपमध्ये व्यक्तिगत चॅम्पियनशिप निवडली जाणार आहे. ही स्पर्धा रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेज येथील राष्ट्रीय खेळाडू सागर पाटील जलतरण तलाव येथे होणार आहे.
स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया या wwwswimminghub.org वेबसाईटवर करता येईल. अशी माहिती संयोजक दीपक घोडके, निलेश जाधव, उमेश कोडोलीकर, रमेश मोरे, महेश पाटील यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes