Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत शारंगधर देशमुख - आदिल फरासांत हमरीतुमरी! !भोई समाजाचे मार्चमध्ये राष्ट्रीय अधिवेशनज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवसमैदानासह नाट्यगृहाचेही बांधकाम चुकीच्या पद्धतीने, कार्यकर्त्यांनी वेधले लक्षमाझे शहर…माझी जबाबदारी ! एकाचवेळी चार हजार हात स्वच्छतेसाठी सरसावणार !संजय घोडावत यांना द ज्वेल्स ऑफ इंडिया पुरस्कारशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शनेभाजप उपाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिकराज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरवनोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा- महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

भोई समाजाचे मार्चमध्ये राष्ट्रीय अधिवेशन

schedule25 Feb 26 person by visibility 8 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय भोई समाज सेवा संघातर्फे येत्या मार्च महिन्यात राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. मुंबई, नागपूर, यवतमाळ किंवा तिरुपती या ठिकाणी हे अधिवेशन होईल अशी माहिती समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. एकनाथ काटकर यांनी दिली. मच्छिमारांच्या विरोधातील सरकारी धोरणासंबंधी आवाज उठविण्यासाठी अधिवेशन आयोजित केले आहे.राज्यातील गोडया पाण्यातील मच्छीमारांचे अनेक प्रश्न सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झाले आहेत. अधिवेशनात यासंबंधी चर्चा करुन निश्चित धोरण ठरविण्यात येणार आहे. अधिवेशनद्वारे सरकारचे लक्ष वेधले जाईल.राज्यात साधारणपणे साडेतीन हजार मत्स्य संस्था आहेत. साडेतीन  लाखाहून अधिक सभासद आहेत. पत्रकार परिषदेला राष्ट्रीय महासचिव गजानन साटोटे, समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष हिम्मतराव मोरे, योगेश श्रीनाथ, नानासाहेब लकारे, पिंटू भोई, मीनाक्षी काटकर आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes