शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने
schedule24 Feb 26 person by visibility 15 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात संघर्ष समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. ‘जमीन आमच्या हक्काची - नाही कुणाच्या बापाची, शेती वाचवा –शेतकरी वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे’अशा घोषणा देत समितीने विरोध दर्शविला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली. शक्तीपीठ महामार्ग लादत असल्याचा आरोप करत सरकारचा निषेध केला. परभणी येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अत्याचार केला. त्या घटनेचा याप्रसंगी निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी विजय देवणे, गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, उदय नारकर, दिलीप पवार, सम्राट मोरे,आदींचा समावेश होता. सोमवारी, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी हे आंदोलन झाले.