संजय घोडावत यांना द ज्वेल्स ऑफ इंडिया पुरस्कार
schedule24 Feb 26 person by visibility 13 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नवी दिल्ली येथे आयोजित 'द ज्वेलस ऑफ इंडिया - भारत की शान, भारत का अभिमान' पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात संजय घोडावत समूहाचे संस्थापक व अध्यक्ष संजय दानचंद घोडावत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. द ज्वेल्स ऑफ इंडिया हा पुरस्कार यावेळी त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींचा परिचय असणाऱ्या "मास्टर इन द आर्ट ऑफ स्टिम्युलस, रिस्पॉन्स अँड ग्रोथ" या पुस्तकात घोडावत यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा समावेश आहे.