Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वालावलकर हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र बनसोडे यांना  जाहीरगोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा गडहिंग्लजमध्ये सत्कारअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्सस्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकरकॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांकडून विकासशुल्क- शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास कॉलेजवर कारवाई

जाहिरात

 

डीवाय पाटील अभियांत्रिकीत एनपीटीईएल जागरूकता कार्यशाळा

schedule30 Oct 24 person by visibility 537 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कोल्हापूर येथे आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी "एनपीटीईएल जागरूकता कार्यशाळा उत्साहात  झाली. 
 आयआयटी मुंबईचे प्रा. श्रीधर अय्यर यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच भारतातील सर्व आयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने "नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नोलॉजी एनहान्सड लर्निंग" म्हणजेच "एनपीटीईएल" या केंद्र शासनाच्या उपक्रमाची दोन दशकापूर्वी स्थापना झाली आहे. या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आणि भविष्यातील धोरणांची माहिती त्यांनी दिली. याचा लाभ सर्व अभियांत्रिकीमधील विविध विद्याशाखांचे शिक्षक आणि विद्यार्थी "ऑनलाईन शिक्षण व सर्टिफिकेट कोर्स" करण्यासाठी घेऊ शकतात.   
या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, एनपीटीईएल समन्वयक डॉ. कपिल कदम, संगणक विज्ञान विभागप्रमुख प्रा. राधिका ढणाल, डिन सीडीसीआर प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे व अध्यापक वर्ग यांचे  सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes