+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Apr 24 person by visibility 153 categoryउद्योग
कागलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस बुधवारी १७ एप्रिल रोजी येत आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कागल तालुक्यातील प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची खरी भेट ठरेल, असे प्रतिपादन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने यांनी केले. कार्यकर्त्यांनो, त्यांच्या विजयासाठी आणि प्रचंड मताधिक्यासाठी जिवाचे रान करा. कागल तालुक्यातून मिळणारे प्रचंड मताधिक्य हेच त्यांच्या विजयाचे लीड ठरेल, असे ते म्हणाले.
  कागलमध्ये मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते.
माने  म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांना आणि दिव्यांग नागरिकांना घरातून मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. कागल तालुक्यामध्ये अशा मतदारांची संख्या दहा हजारांवर आहे. मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यादिवशी अशा मतदारांच्या घरी जाऊन प्रा. मंडलिक यांच्या प्रचंड मताधिक्याच्या विजयाचा संकल्प त्यांना सांगा.   
   व्यासपीठावर तात्यासाहेब पाटील, चंद्रकांत गवळी, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष नवल बोते, मनोजभाऊ फराकटे, नितीन दिंडे, विकास पाटील, संजय चितारी, अर्जुन नाईक, अतुल मटूरे, आर. व्ही. पाटील, रवींद्र पाटील, जयदीप पवार, दिनकरराव कोतेकर, सतीश घाडगे, प्रमोद पाटील, ॲड. जीवनराव शिंदे, नेताजीराव मोरे, शशिकांत नाईक, नवाज मुश्रीफ, अस्लम मुजावर आदी प्रमुख उपस्थित होते.