खड्डेमुक्तीसाठी आपतर्फे महापालिका घेराओ आंदोलन
schedule14 Aug 24 person by visibility 223 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खराब रस्ताप्रश्नी आम आदमी पार्टीतर्फे महापालिकेला घेराओ आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, बुधवारी (१४ ऑगस्ट) सायंकाळी आपच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करत आंदोलन केले. यामध्ये नागरिकांचा सहभाग होता.
हातात हात घेऊन मानवी साखळी करत नागरिकांनी शहरातील खराब रस्तेप्रकरणी महापालिकेचा निषेध केला. देशभक्तीपर गाणी, खड्ड्यांवरील कविता म्हणत लक्ष वेधले. यावर प्रशासकांकडून ठोस लेखी उत्तर न मिळाल्यास या घेराव आंदोलनाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात करून स्वातंत्र्य दिनी महापालिकेसमोर बसण्याचा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला होता.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, वसंतराव मुळीक, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, किरण साळोखे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, डॉ. कुमाजी पाटील, बबन कावडे, संजय नलवडे, मयुर भोसले, इस्थेर कांबळे, आदम शेख, उषा वडर, बबन भालेराव, नाझील शेख, लखन काझी, उमेश वडर, रवींद्र राऊत, रणजित पाटील, मनोहर नाटकर, रमेश कोळी, अमरसिंह दळवी, दिग्विजय चिले, प्रथमेश सूर्यवंशी, स्वप्नील काळे, ओंकार पताडे, संजय सूर्यवंशी, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
दरम्यान
महापालिका प्रशासनाकडून दोष दायित्व मुदतीत असलेले रस्त्यांची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात करू, क्वालिटी कंट्रोलसाठी विभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करू, डांबरी पॅचवर्कचे काम पंधरा दिवसात पूर्ण करू, नगरोथान मधून आणखीन निधी मागणीचा प्रस्ताव केला आहे, तो पुढील मंजुरीसाठी पाठवू, रस्त्याची गुणवत्ता राखण्यासाठी दक्षता समिती स्थापन करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही ठेवण्यात येईल. अभियंता भरतीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत कर्मचारी भरणार असल्याचे महापालिकेकडून लेखी देण्यात आले असे आपने म्हटले आहे.