Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना  कुसुम पुरस्कार, बुधवारी वितरणशाहू मिल चौकातील अपघातात दोघांचा मृत्यू, महापौरांची सीपीआरला तातडीची भेट  शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविलेहार नको, बुके नको…केवळ पेन घेऊन भेटीस या ! महापौर रुपाराणी निकम यांनी दाखविले वेगळेपण!!महापालिकेतही महायुती, महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग ! जल्लोषात मंत्री, खासदार, आमदारांचाही सहभाग!! जिल्हा नियोजन समितीची मंगळवारी सभाएमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी अर्ज भरावेतमहापालिकेवर महायुतीचा झेंडा, समर्थकांच्या जल्लोषाला उधाण मंत्री खासदारांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार ! कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प कामाला गती मिळावी - सुरेंद्र जैन

जाहिरात

 

महापालिकेची कोल्हापूर शहर-गांधीनगरात कारवाई, पाच हजार किलो प्लॅस्टिक जप्त

schedule21 Mar 25 person by visibility 524 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोल्हापूर शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केल आहे. शुक्रवारी (२१ मार्च) दुपारी सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांनी चार पथकांमार्फत करवीर निवासिनी अंबाबाई मंदीर परिसर, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, बाजार गेट परिसर, लक्ष्मीपुरी  भागात मोहिम राबविलि. तसेच महापालिका हद्दीतील गांधीनगर परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली. यावेळी दुकानदार, रोडवरील फळविक्रेते, भाजी विक्रेते व इतर किरकोळ ७८ विक्रेत्यांकडे वापरण्यात येणारे सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त केले. जवळपास पाच हजार किलो प्लॅस्टिक जप्त केले.

     महापालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबविण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes