Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीचपुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहातशक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, शिक्षकमधून जयंत आसगावकर, पदवीधरसाठी हर्षदा देशमुखांचा अर्ज ! नेतेमंडळीची उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित!!अकॅडमी रिसर्च इंडेक्समध्ये डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्यास्थानी ! डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्यास्थानी !! मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थितीगोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !

जाहिरात

 

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!

schedule06 Oct 26 person by visibility 26 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात यंदा उमेदवारांची संख्या पोहोचली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी, सहा ऑक्टोबर २०२६ पर्यत मुदत होती. या कालावधीत उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी अर्ज भरला आहे. भाजपकडून विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिंदे पक्षाकडून मंगेश चिवटे यांचा अर्ज दाखल केला. दरम्यान सात ऑक्टोबर २०२६ रोजी अर्जांची छाननी आहे.

२०१४ ते २०२६ या कालावधीत आमदार म्हणून काम केलेले माजी आमदार दत्तात्रय सावंत व त्यापूर्वी शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार भगवानराव साळुंखे, विना अनुदानित शाळा कृती समितीचे नेते खंडेराव जगदाळे, तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून मुंढवा पुणे येथील सुनील मधुकर जगताप यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. या तीनही उमेदवारांनी राजकीय पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. लोकराज्य जनता पक्षातर्फे दादासाहेब लाड यांचा अर्ज आहे. मुक्त सैनिक वसाहत कोल्हापुरातील इकबाल चंदूलाल शेख यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणार आहेत. धनकवडी येथील दिपाली दिलीप सुर्यवंशी यांनी नेताजी काँग्रेस सेनेतर्फे तर सलगरे येथील सदाशिव सिदधू कांबळे यांनी नॅशनल पीपल्स पार्टीकडुन अर्ज भरला

शिक्षक मतदारसंघात अपक्ष लढणाऱ्या उमेदवारांमध्ये सांगली जिल्हयातील शिराळा येथील सम्राट विजयसिंह शिंदे , आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी येथील दिलीप कचरे, सातारा येथील रजनीश श्रीकांत पिसे, फलटण येथील वैशाली विजय शिंदे, पिंपरी येथील बाळासाहेब गोतारणे , विद्यानगर बारामती येथील फत्तेसिंह शहाजीराव पवार, बारामती येथील अनिल देवदान मोहिते, प्रफुल्ल भिमराव तावरे, बारामती येथील गोविंद भाऊसाहेब वाघ,  सातारा येथील सुधीर सुर्यकांत विसापुरे, अंबवडे येथीव रघुनाथ यशवंत जाधव, सातारा येथील अभिजीत जयसिंगराव आवाडे बिचुकले, फलटण तालुक्यातींल राजेंद्र शंकरराव शिर्के, म्हसवड येथील सिताराम भोरले, सासवड येथील नंदकुमार पंढरीनाथ सागर, कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्ले येथील शिक्षक करणसिंह सुरेशराव सरनोबत, चंदगड तालुक्यातील कृष्णा महादेव गावडे, खुपिरे येथील अरुण उमेश सावंत, कुपवाड सांगली येथील बापू प्रदीप दाभाडे, कात्रज येथील हरिदास उत्तम चव्हाण, पुणे येथील अश्विनी नितीन कदम, सुदर्शना रमेश त्रिगुणाईत, लांडगेवाडी येथील सचिन केशवराव आढळराव, तळेगाव ढमढेरे येथील गुलाब गवळे, मुंढवा पुणे येथील राजेंद्र सुरेंद्र कुराडे, मिरज तालुक्यातील बेडग येथील राजेंद्र सुभाष नागरगोजे, शिवाजीनगर पुणे येथील सचिन नवनाथ सानप, पंढरपूर येथील बी. पी. रोंगे अपक्ष, पुणे जिल्ह्यातील मांजरी बुद्रुक येथील सुनील संभाजी लंगडे, बाळू महादेव शेलार,सोलापूर जिल्हयातील चिंचोली येथील गणेश दामोदर नीळ, कुर्डुवाडी येथील प्रशम कोल्हे, कपिलदेव शंकर कोळी, यांचा समावेश  आहे. सानप हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक होते. ते पुण्यात मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. पंढरपूर व परिसरात प्रा. रोंगे हे शिक्षण क्षेत्रात काम करतात. त्यांनीही राजकीय पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes