विवेकानंदमध्ये बारावीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार
schedule21 May 24 person by visibility 738 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बारावी परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा विवेकानंद कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते कला, वाणिज्य् व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.
विज्ञान शाखेत उस्ताद अल्तमाश मुश्ताक 95.00 टक्के गुण मिळवून प्रथम आला. माने ओम रमेश 94.83 टक्के गुणांसह व्दितीय तर राम अर्चनाकुमारी दरोगा हिने 92.33 टक्के गुण मिळवून तिसरी येण्याचा मान मिळविला.
वाणिज्य शाखेत शेवरमनी खुशी प्रेम 95.33 गुण मिळवून प्रथम, पाटील शुभम प्रबोध 93.83 गुण मिळवून व्दितीय आणि गोंधळी वैभवी अनिल 93.00 टक्के गुण संपादन करुन तिसरी आली.
कला शाखेत लवटे विवेक कृष्णात 90.83 गुण मिळवून प्रथम , कु. पाटील श्रावणी नंदकुमार, 88.67 गुण संपादन व्दितीय, तर नदाफ नाझिया राकेश 87.67 टक्के गुण मिळवले.
कला शाखेचा निकाल 86.34 , वाणिज्य शाखेचा 98.53 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 99.88 टक्के इतका लागला. सरासरी निकाल 97.63 टक्के इतका लागला आहे. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
प्रा..एम.ए.कुरणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सौ यु.आर.हिरकुडे यांनी स्वागत मानले. प्रा.विश्वंभर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.