+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Apr 23 person by visibility 226 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे गुरुवारी (२७ एप्रिल) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी स्थापना करण्यासंदर्भात बैठक आहे. 
  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.  खासदार डॉ.श्री.श्रीकांत शिंदे यांचा गेल्या महिनाभरात सलग दुसरा कोल्हापूर दौरा आहे ‌ या दौऱ्यादरम्यान लोकोपयोगी उपक्रमांचे आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता "शासकीय योजनांची जत्रा" या मेळाव्याचे अभिषेक लॉन, ब्रम्हपुरी, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी रंकाळा तलावास मंजूर केलेल्या १५ कोटी रुपयांच्या विकास कामा अंतर्गत  सुरु असलेल्या कामांची पाहणी खासदार शिंदे हे दुपारी एक वाजता करणार आहेत.  रंकाळा तलाव येथे फाउंटन विथ लाईट सिस्टीम (Fountain With Light System ) बसविण्यासंदर्भात रंकाळा तलाव येथे जागेची पाहणी करणार आहेत. गेल्या महिन्यातील दौऱ्यात राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपस्थिती दरम्यान खासदार  शिंदे यांनी कोल्हापूर शहरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अॅकॅडमी स्थापन करण्याची ग्वाही दिली होती, याअनुषंगाने दुपारी १.३० वाजता जिल्हाक्रीडा अधिकारी श्री.चंद्रशेखर साखरे यांचे समवेत शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचीही क्षीरसागर यांनी सांगितले.