
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री श्री रविशंकरजी आणि पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी, अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत दोन दिग्गज व्यक्तिमत्वे. दोघांचीही ख्याती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर. मंगळवारी (31 जानेवारी) सुमंगलम महोत्सवस्थळी हे दोन अध्यात्मिक गुरू एकमेकांना भेटले. एकमेकांच्या कार्याची स्तुती केली. याप्रसंगी बोलताना श्री श्री रविशंकरजी यांनी "सुमंगलम महोत्सव हा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा महोत्सव आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी अध्यात्मिक, सामाजिक, कृृषी, पर्यावरणासंबंधी प्रबोधन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात जे कार्य करत आहेत ते प्रेरणादायी आहे"असे कौतुकोदगार काढले.
कणेरी मठ येथे वीस ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव होत आहे. या महोत्सवाची सध्या कणेरी मठ परिसरात तयारी सुरू आहे. श्री श्री रविशंकरजी हे ३१ जानेवारी व एक फेब्रुवारी असे दोन दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी कनेरी मठ परिसरात भेट दिली. सुमंगलम महोत्सव स्थळाची पाहणी केली. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते श्री श्री रविशंकरजी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रविशंकरजी यांच्या हस्ते काडसिद्धेश्वर स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सुमंगलम महोत्सवसंबंधी माहिती दिली. तसेच श्री श्री रविशंकरजी यांना महोत्सव कालावधीत सहभागी होण्याची विनंती केली. याप्रसंगी बोलताना श्री श्री रविशंकरजी यांनी पूज्यश्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या पुढाकारातून होत असलेले सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव भारतीय संस्कृती अध्यात्म पर्यावरण अशा विविध घटकांचे घडवणारे आहे. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांचे कार्य साऱ्यांनाच प्रेरणादायी आहे. असे उद्गार काढले. यावेळी कर्नाटकातील अरविंद देशपांडे, रागवेंद्र कागवाड, कुष्णानंद, उद्योजक सुरेंद्र जैन आदी उपस्थित होते. डॉ.संदीप पाटील यांनी सूूत्रसंचाल केले.