Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड शिक्षकांचा एकच निर्धार, कौस्तुभ गावडेंना आमदार करुन विधानपरिषदेत पाठविणारराज्यभरातील व्यापार -व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची पणनमंत्र्यांच्यासोबत चर्चा ! बाजार समिती पदाधिकारी व्यापाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक!!वीज कामगारांचे हाल करण्यासाठी मेस्माची चाल सरकारने वापरली का? कामगार संघटनेचा सवालसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सवबाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिकआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाई

जाहिरात

 

औषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

schedule20 May 26 person by visibility 229 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : औषधांची ऑनलाइन विक्री बंद झाली पाहिजे या मागणीसाठी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी, बुधवारी २०मे २०२६ रोजी दुकाने बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात जिल्ह्यातील चार हजाराहून अधिक औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदन दिले.

अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनकडून आंदोलनाची देशव्यापी हाक देण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील व्यावसायिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. ऑनलाइन औषध विक्री बंद करावी, नकली औषधांवर बंदी घालावी या प्रमुख मागण्या घेऊन औषध विक्रेते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.मोर्चातील साऱ्यांनी, पांढरा शर्ट परिधान करुन आणि खिशाला काळी रिबीन लावून आंदोलनात सहभाग घेतला. ‘ऑनलाइन फार्मसीला जोरदार  विरोध आमचा अधिकार, रुग्ण सुरक्षा हाच निर्धार’, ‘नकली औषध विक्रेत्यांवर कारवाई करा’, असे फलक औषध विक्रेत्यांच्या हाती होते.

 ‘डॉक्टरांच्या लेखी सूचनेशिवाय औषध विक्रीला पायबंद करा, बेकायदेशीरपणे घरपोच औषधे देणाऱ्यांवर कारवाई करा’या मागण्या करण्यात आल्या. जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष किरण जाधव, संदीप मिसाळ, सचिव प्रल्हाद खवरे, खजानिस दाजीबा पाटील, सहसचिव मोहन ढेरे, संघटन सचिव सचिन पाटील, अशोक बोरगावे, महेश सावंत, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes