पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा अधिकाऱ्यांना साडी-चोळीचा आहेर
schedule24 Mar 23 person by visibility 382 categoryमहानगरपालिका

अपुरा पाणी पुरवठयावरुन माजी नगरसेवक आक्रमक ! अधिकाऱ्यांना तीस मार्चपर्यंतचा अल्टिमेटम !!
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अपुरा पाणी पुरवठयावरुन माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील विविध भागात गेले कित्येक दिवस पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नाही. वारंवार तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसेल तर अधिकारी काय करतात ? असा खडा सवाल करत ३० मार्चपर्यंत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिकाऱ्यांना साडी-चोळी आणि बांगडयाचा आहेर देउ असा इशारा यावेळी देण्यात आला.
महापालिकेच्या माजी नगरसेवकांची गुरुवारी (ता.२३ मार्च) पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत विविध प्रभागतील पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटीचा पाढाच माजी नगरसेवकांनी वाचला. जल अभिषंता हर्षजित घाटगे, उपजलअभियंता प्रिया पाटील, अभिलाषा दळवी, शाखा अभियंता मिलिंद जाधव, पंपिंग स्टेशन विभागाचे जय जाधव यांच्यासोबत बैठक झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष व स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, आदिल फरास, सचिन पाटील, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, राजाराम गायकवाड, प्रतापसिंह जाधव, नियाज खान यांनी पाणी प्रश्नावरुन अधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
माजी महापौर माधवी गवंडी, निलोफर आजरेकर, स्वाती यवलुजे, माधुरी लाड, दीपा मगदूम, उमा बनछोडे, प्रतिज्ञा उत्तुरे, वृषाली कदम, छाया पोवार, यांनीही अपुरा पाणी पुरवठाकडे लक्ष वेधले.
याप्रसंगी माजी नगरसेवक श्रावण फडतारे, विनायक फाळके, रियाज सुभेदार, दुर्वास कदम, महेश उत्तुरे, शिवानंद बनछोडे, दिग्विजय मगदूम, आशपाक आजरेकर, उमेश पोवार आदी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी, येत्या आठ दिवसात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करू असे सांगितले.