महात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशील
schedule29 Jun 26 person by visibility 19 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी : पीएम श्री महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी शाळेत हॅपी डिजिटल क्लासरूमची निर्मिती केली आहे. रोटरी क्लब हेरिटेज ऑफ कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून पीएमश्री महात्मा फुले विद्यालयातील सहा वर्ग खोल्या सचित्र रंगून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक वर्गात एक इंनट्रॅक्टिव्ह पॅनल बोर्ड बसविले आहेत.
नगरसेविका माधवी पाटील व आनंदराव पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक- अध्यक्ष व महात्मा फुले सहकारी दूध संस्थेचे, चेअरमन मानसिंग पाटील, रोटरी क्लब हेरिटेज कोल्हापूरच्या अध्यक्षा पूजा गांधी, प्राथमिक शिक्षण समितीकडील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मरसूल पाटील, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज कोल्हापूरचे सदस्य किशोर परमार, सागर सरनाईक, उद्योजक लंबोदर जाधव- कसबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्लासरुमचे उद्घाटन झाले.
मानसिंग पाटील म्हणाले, पीएम श्री महात्मा फुले विद्यालय हे शहरातील एकमेव विद्यालय आहे ज्याची निवड पीएमश्री योजनेअंतर्गत झाली आहे .शाळेतील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. येथील शिक्षक देखील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. विद्यालयाची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे येत्या काही दिवसात आपण वर्गखोल्या काही प्रमाणात पूर्ण करणार आहोत. हे विद्यालय शहरातील एक मॉडेल स्कूल म्हणून येत्या काळामध्ये साकारणार आहोत.
पूजा गांधी म्हणाल्या ,संपूर्ण शाळा अतिशय स्वच्छ आणि रंगरंगोटी केल्यामुळे आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. त्यामुळे एक चांगले वातावरण मुलांना शिकण्यास तयार झाले आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या विविध सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुप्रिया खाडे,श्रीकांत पवार, शिक्षक कृष्णात यादव, नयना बडकस, राहुल बागडे, संतोष गोसावी, माधुरी चिंचणे, वैशाली पाटील, उत्तम वाईंगडे, नितीन गभाले, नितीन खुडे, विजयकुमार माने, सागर संकपाळ, अनंत रावळजोगी, श्रीकांत पाटील, लखन चव्हाण उपस्थित होते. शिक्षक कुलदीप जठार यांनी प्रास्ताविक केले संतोष आंबेकर यांनी आभार मानले.