शहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
schedule29 Jun 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रशिक्षक सुयोग बुटाले यांनी, ‘योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आज संपूर्ण जगाने योगाचे महत्त्व मान्य केले असून योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.’असे सांगितले. प्रात्यक्षिक सत्रामध्ये विविध योगासने व प्राणायाम यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच उपस्थितांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अविनाश पालकर यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. सागर शेटगे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कार्यक्रमाचे समन्वयन केले.