Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ना मुहूर्त पाहतो, ना स्वत: श्रीफळ वाढवितो…अमावस्येला कामाला प्रारंभ, कर्मावर विश्वास ! संजय घोडावतांचा अनोखा बिझनेस फंडा !!बीएनआयच्या इंडस्ट्रियल मिक्सरमध्ये उलगडल्या उद्योजकांच्या सक्सेस कहाण्याकरवीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार - सभापती साताप्पा पाटीलविना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदान आंदोलनास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबारविकिरण इंगवलेंचा राजेश क्षीरसागरांच्यावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचा इंगवलेंच्यावर पलटवारवीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा ! कोल्हापुरात रंगला आनंदोत्सव !!टीईटीचा पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द !  शिक्षकांना धक्का !!मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवादबीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

बीएनआयच्या इंडस्ट्रियल मिक्सरमध्ये उलगडल्या उद्योजकांच्या सक्सेस कहाण्या

schedule28 Jun 26 person by visibility 15 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : त्यांच्यापैकी कोण कारखानदार, कोण फौंन्ड्री उद्योगातील. तर कोण शिक्षण व सेवा क्षेत्रात काम करणारे. टेक्सटाईल्सही निगडीत काही मंडळी. लहानसहान व्यावसायिकापासून उद्योगपतीपर्यंत…प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी. मात्र ते सारे बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनलतर्फे आयोजित ‘इंडस्ट्रीयल मिन्क्सर ३.०’ या व्यासपीठावर एकटवले. अनुभव शेअर केले. ‘उद्योग संवाद’ परिसंवादातून उद्योजकांच्या सक्सेस स्टोरी उलगडल्या. बीएनआयतर्फे २७ जून २०२६ रोजी कोल्हापुरात ’राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग् मेळावा’ आयोजित केला होता. हॉटेल सयाजी येथे हा कार्यक्रम झाला.

 उद्योग क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे, राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करणे आणि नव्या व्यावसायिक संधी निर्माण करणे या उद्देशाने कोल्हापुरात २७ जून रोजी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा आयोजित केला होता. राज्याच्या विविध भागातील उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेतला. दिवसभर हा कार्यक्रम झाला. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ‘उद्योग संवाद’हा परिसंवाद झाला. मार्व्हलस ग्रुपचे संग्राम पाटील, चकोते ग्रुपचे अण्णासाहेब चकोते, झंवर ग्रुपच्या जिया झंवर, उद्योजक निकुंज बगाडिया यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. चितळे ग्रुपचे मकरंद चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती. घोडावत उद्योग समूहाचे प्रमुख संजय घोडावत यांचे विशेष मार्गदर्शन सत्र होते. बीएनआय बीएनआय कोल्हापूर सांगली – इचलकरंज्ी शाखेतर्फे याचे आयोजन केले होते.

 ‘गुणवत्तापूर्ण उत्पादने, ग्राहकाभिमुख सेवा, नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार करणे महत्वाचे आहे. उद्योग व्यवसायाचा विस्तार करताना भविष्यकालीन वेध घेऊन पावले उचलली पाहिजेत. ग्राहकांच्या गरजा, गुणवत्तापूर्ण उत्पादनांची सांगड घालायला हवी. व्यवसायात विश्वासार्हता महत्वाची. बाजारपेठेसोबतच स्पर्धक काय करतात यावर लक्ष हवे. मात्र हे सारे करत असताना व्यापार, व्यवसायातील मानवी चेहरा हरवू नये. तंत्रज्ञान हे मनुष्यबळाला पर्याय ठरू नये.’अशी मते व्यक्त केली.

बीएनआय कोल्हापूर शाखेच्या कार्यकारी संचालक भव्या सत्रा, प्रीत सत्रा यांनी स्वागत केले. याप्रसंगी नीरज शहा पद्मसिंह देवल, अमित मगदूम, शिवजीत बेनाडीकर, आकेत शहा, सागर कुलकर्णी, आशिष चांदगुडे आदी उपस्थित होते. इचलकरंजीच्या ज्योती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes