महालक्ष्मी बँकेतर्फे शनिवारी विद्यार्थ्यांचा गुणगौरव-ज्येष्ठ सभासदांचा सन्मान
schedule12 Aug 22 person by visibility 441 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : श्री महालक्ष्मी को-ऑप ब बँकेतर्फे शनिवारी (ता.13 ऑगस्ट 2022) रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व बँकेच्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार आयोजित केला आहे.अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर यांनी दिली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी दहा वाजता कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रा. वैजनाथ महाजनअध्यक्षस्थानी असणार आहेत. या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. महालक्ष्मी बँकेने ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. बँकेचे उपाध्यक्ष महेश धर्माधिकारी व अन्य संचालकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे.