खासदार महाडिकांनी वेधले गृहमंत्र्यांचे लक्ष ! सभेत केली अंबाबाई विकास आराखडा व खंडपीठाची मागणी !!
schedule20 Feb 23 person by visibility 1011 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात आपली छाप पाडली. खासदार महाडिक यांनी वाराणसी, उज्जैनच्या धर्तीवर कर्वे निवासिनी अंबाबाई देवस्थान विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हावी, कोल्हापुरात खंडपीठाची स्थापना करावी अशी मागणी केली. कोल्हापूरच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजनेकडे महाडिक यांनी गृहमंत्री शहा यांचे लक्ष वेधले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नागाळा पार्क येथे भाजपचा विजय संकल्प मेळावा झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील, आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, राहुल चिकोडे, सत्यजित कदम, महेश जाधव यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदार व भाजप अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात बोलताना खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर बनत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपली ताकद क्षमता सिद्ध केली. अर्थव्यवस्थेला किती मिळाली. सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. सहकारमंत्री अमित शहा यांनी साखर उद्योगाला चालना देणारे निर्णय घेतले. सहकारी साखर कारखान्यांची दहा हजार कोटींचा प्राप्तिकर रद्द केला. भाजप सरकारच्या या निर्णयाने साखर उद्योगाला उभारी मिळाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा ते कागल रस्ता विस्तारीकरणासाठी प्रचंड निधी दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या विकास योजनांना बळ दिले आहे. विमान सेवेसाठी निधी उपलब्ध करुन दिला. विमानतळ विकासाला चालना दिली."
आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणू. जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून जो आदेश येईल त्यानुसार काम करून भाजपचा विजयाचा झेंडा फडकवू."असेही खासदार धनंजय महाडिक यांनी अनमूद केले.