संच मान्यता त्रुटी दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा
schedule24 Aug 26 person by visibility 33 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : उच्च माध्यमिक संच मान्यता त्रुटी दुरुस्तीसाठी आमदार जयंत आसगावकर व कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, विभागीय शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी संच मान्यता दुरुस्ती संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत ज्या कॉलेजच्या मान्यता आहेत. ऑनलाइन ग्रीव्हन्स मधून दुरुस्त करून दिल्या जातील. प्रलंबित प्रस्तावाची त्वरित मंजुरी द्यावी. अनुकंपा खालील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व इतर मान्यता त्वरित द्याव्यात. वरिष्ठ व निवड श्रेणीच्या मान्यता त्वरित द्याव्यात. यासह इतर विविध १० विषयावरती चर्चा झाल्या. कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.अण्णासाहेब बागडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विजय मेटकरी,ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. बी.डी.लोंढे, प्रा. अरविंद जैनापुरे, मुख्याध्यापक इरफान अन्सारी यासह कोल्हापूर विभागातून आलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.