कोल्हापूर राज्यात आदर्शवत करू : आमदार जयश्री जाधव
schedule26 Mar 23 person by visibility 457 categoryराजकीय

शहराच्या विविध भागात साठ लाख रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विविध समस्यावर अधिवेशनात आवाज उठवला आहे. त्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जास्तीत जास्त निधी खेचून आणून कोल्हापूर शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करू आणि कोल्हापूर शहर राज्यात आदर्शवत करू अशी ग्वाही आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.
आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून शहराच्या विविध भागात सुमारे साठ लाख रुपये निधीच्या विकास कामाचे उद्घाटन आज करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगरसेवक रमेश पोवार, लता कदम, प्रतापसिंह जाधव, रियाज सुभेदार, अनिल पाटील, दिलीप माने, माजी नगरसेवक धनाजी आमते, अनिल पाटील, निशिकांत मेथे, इंद्रजीत आडूरे, मोहन सरवणकर, चंदा बेलेकर, बाळासाहेब कंद्रे, करण शिंदे, अमित जाधव, सुदर्शन सावंत, शिरीष करंबे, संपत चव्हाण, उदय पवार, मेहजनबी सुभेदार, शिवाजी जाधव उपस्थित होते.महा