युवाशक्ती जागर यात्रेत कृष्णराज महाडिकांचे तडाखेबाज भाषण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून यात्रेला प्रारंभ
schedule22 Apr 26 person by visibility 15 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ आपले नेते किंवा गुरू नाहीत. तर ते माझ्यासाठी विद्यापीठ आहेत.त्यामुळे आपण युवा कार्यकर्त्यांसाठी सारथी म्हणून काम करण्यातस तयार आहे. जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्याला थांबवू शकणार नाही’असे तडाखेबाज भाषण भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले.
निमित्त होतं, भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चांतर्फे आयोजित जागर यात्रा उद्घाटनेचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री नितेश राणे, खासदार धनंजय महाडिक आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागर यात्रेचा प्रारंभ झाला. मुंबईतींल भाजप कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कृष्णराज महाडिक यांनी जोरदार भाषण केले. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणे हे सुध्दा भाग्याचे असून, सबका साथ-सबका विकास ही पंतप्रधान मोदींची घोषणा सत्यात आणण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, युवाशक्ती जागर यात्रेला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘युवाशक्ती जागर यात्रा एक नवा इतिहास निर्माण करेल. युवाशक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरित करण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी तरुणाईची ताकत लागावी. यासाठी ही यात्रा महत्वपूर्ण आहे. तरुणाईच्या ऊर्जेला योग्य वळण देण्यासाठी आणि युवा मोर्चाचे संघटन वाढविण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल.’असा विश्वास व्यक्त केला. या यात्रेच्या उद्घाटनप्रसगी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे रोपटे देऊन स्वागत केले.