Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मिलेट रांगोळीतून साकारली शाहू महाराजांची प्रतिमाशैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशक नेमण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे शोकसभा,  डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना श्रद्धांजलीखाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा, 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग गोकुळसंबंधीच्या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सवालवाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ - माजी कुलगुरू माणिकराव साळुंखेखासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कारपीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचा उद्घाटन सोहळा दिमाखातप्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधनआयटी असोसिएशनतर्फे शुक्रवारी कृतज्ञता कार्यक्रम

जाहिरात

 

शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशक नेमण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

schedule22 Apr 26 person by visibility 32 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण विचारात घेऊन, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी समुपदेशक  नियुक्त करणे अनिवार्य करावे, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्यावतीने उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे,'प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये कायमस्वरूपी 'मानसोपचार तज्ज्ञ' किंवा 'समुपदेशक' नेमावा, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात 'मेंटल हेल्थ' सेशनचे आयोजन करण्यात यावे. शैक्षणिक संस्थांमध्ये गोपनीय हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थी आपली समस्या मोकळेपणाने मांडू शकतील. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ओळखण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने अंमलबजावणी करावी.अशी मागणी मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेने केली. यावेळी मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक साळुंखे, सचिव धनंजय गायकवाड, सरचिटणीस सूर्यभान इंगळे, शहराध्यक्ष विराज पाटील, आदित्य पाटील, हर्षवर्धन शिंदे, सार्थक पाटील, ओंकार शिंदे, सिद्धार्थ यादव, अथर्व शिंदे, हर्षवर्धन पाटील, अभिजित देसाई, गौरव आवटे, अखिलेश गवळी, सुमित कांबळे, चिन्मय जोशी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes