खाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा, 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग
schedule22 Apr 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' शिक्षण हीच राष्ट्रीय संपत्ती असून विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली आहे.' असे प्रतिपादन खाजगी शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी केले.ते खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित शिष्यवृती सराव परीक्षेत गुणवत्ता प्राप्तविद्यार्थी सन्मान सोहळ्यात बोलत होते.
पतसंस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षीप्रमाणे इयता चौथी व सातवीसाठी मोफत शिष्यवृती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या इयत्ता चौथीच्या ११ व इयत्ता सातवीच्या ६ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केलेले केंद्र संचालक गोरख वातकर, सागर पाटील, संतोष केसरकर, महादेव डावरे, सर्जेराव नाईक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पतसंस्थेच्या सभासद मंगल पाटील यांच्या कन्या अक्षया पाटील यांची पुरवठा अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तसेच अनघा सूर्यकांत पाटील यांची कनिष्ठ लेखापाल जिल्हा कोषागार कार्यालय धाराशिव येथे निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
चेअरमन साताप्पा कासार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्र संचालक गोरख वातकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सोनाळकर यांनी केले. मच्छिंद्र नाळे यांनी आभार मानले.यावेळी संचालक राजेश कोंडेकर, सल्लागार समिती सदस्य आप्पासाहेब वागरे, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी उपस्थित होते.