+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustवस्ताद बाबूराव चव्हाण यांचे निधन adjustकागल-पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी-धैर्यशील माने adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार
1000926502
1000854315
schedule30 May 23 person by visibility 281 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनिस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश शक्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी सुमारे २१५ कि.मी. पाईपलाईनची भुयारी गटर करणे, शहरात १०१ एम.एल.डी क्षमतेचे मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी आवश्यक ३५४ कोटी रुपये इतक्या रक्कमेचे स्वतंत्र तीन प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची भेट घेतली आणि निधी मंजुर करावा अशी मागणी केली. यासह अव्वर मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठ यांच्याशीही चर्चा केली. सद्यस्थितीत प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी शासन स्तरावर सादर करण्यात आले असून, लवकरच अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी भुयारी गटर करणे, शहरात मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी ३५४ कोटी निधी मंजूर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती  क्षीरसागर यांनी दिली आहे.