+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक adjust कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा अवॉर्ड ऑफ ऑनरने गौरव adjustराजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार - अमल महाडिक adjustकोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !! adjust पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक adjustचांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय adjustशेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !! adjust चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड adjustसासूबाई जोरातमध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट adjustवीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
Screenshot_20230905_091804~2
Screenshot_20230903_122011~2
schedule30 May 23 person by visibility 135 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हिंगणमिठ्ठा ! नुसता शब्द जरी उच्चारला तरी वेगळया चवीचा स्वाद चाखल्याची प्रचिती येते. मात्र कोल्हापूरकरांना आता हिंगणमिठ्ठाद्वारे लेखनाचा आस्वाद घेता येणार आहे. कोल्हापूरची वेगळी ओळख ‘हिंगणमिठ्ठा’या पुस्तकाद्वारे वाचकांना होणार आहे. कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक उत्तम फराकटे यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकाच्या लेखणीचा गोडवा चाखता येणार आहे.
उत्तम फराकटे हे गेली २२ वर्षे बांधकाम क्षेत्रात सक्रिय आहेत. वैशिष्ट्यपू मात्र त्यांची ओळख फक्त बांधकाम व्यावसायिक अशी मर्यादित नाही. ते उत्तम खेळाडू आहेत. त्यांना वाचनाची आवड आहे. त्यांना लिखाणाची गोडी आहे. प्रवासवर्णन लिहिली आहेत. ललित लेखन केले आहे. क्रिडाई संस्थेच्या पुस्तिकेचे संपादन केले आहे. त्यांनी आयर्न मॅन म्हणून किताब पटकाविला आहे. शिवाय अॅथलेटिक्स स्पर्धा जिंकल्या आहेत. फराकटे यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या पद्माराजे विद्यालय (मुलांची शाळा) येथे झाले. मेन राजाराम हायस्कूल येथे हायस्कूलपर्यंत तर डॉ. डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेज येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण झाले आहे.
‘हिंगणमिठ्ठा’पुस्तकाच्या निर्मितीविषयी बोलताना उत्तम फराकटे म्हणाले, “कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जग ठप्प असल्यासारखी स्थिती होती. या कालावधीत वर्तमानकाल ठप्प बनला आहे की काय असे चित्र होते. अस्थिर वर्तमान आणि धूसर भविष्यकाळ असे वातावरण होते. या स्थितीवरही माणसांनी नेटाने मात केली. मात्र या कालावधीत प्रत्येकाच्या मनात गतकाळातील अनेक आठवणी रुंजी घालत होत्या. भूतकाळ लख्खपणे डोळयासमोर तरळत होता
. या कालावधीतच मला शिकवलेले प्राथमिक शाळेतील गुरुवर्य वसंतराव शंकर भोसले यांचे निधन झाले. गुरुजींच्या निधनाने सारा भूतकाळ पुन्हा आठवला. अनेक आठवणींना उजाळा मिळाला. त्यांच्या आठवणींने मन उंचबळून यायचे. डोळयांच्या कडा ओला व्हायच्या. शालेय जीवनातील त्या साऱ्या आठवणी, त्या वेळच्या आवडीनिवडी, कोल्हापुरातील वातावरण हे सारं सारं शब्दबद्ध करावे असं मनोमन वाटू लागलं आणि येथेच पुस्तक निर्मितीला अंकुर फुटले. हिंगणमिठ्ठा आकार घेऊ लागला.”
दोन-तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर हिंगणमिठृठा तयार झाला आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठही वैशिष्ट्यपूर्ण आणि आशययुक्त आहे. निर्मितीचे अनंत खासबारदार यांनी मुखपृष्ठ तयार केले आहे. बुधवारी (३१ मे २०२३) संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृह येथे सायंकाळी पाच वाजता या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होत आहे. शिक्षणतज्ज्ञ माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रणधीर शिंदे, न्यूरो सर्जन संतोष प्रभू उपस्थित राहणार आहेत. भाग्यश्री प्रकाशन ही संस्था प्रकाशक आहे.