Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील ६१८ शाळा महिला शिक्षकाविना !  नजीकच्या शाळेतील शिक्षिकेवर किशोरी संवादची जबाबबारी !!सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ? रस्त्यांच्या कामाची तपासणी करा !!सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ! रस्त्याचे कामाची तपासणी करा !!ठेकेदाराचा हलगर्जीपणा, कनिष्ठ अभियंत्यांची कर्तव्यात कसूर ! फुलेवाडीतील इमारत दुर्घटना प्रकरण !!जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडतअग्निशमन इमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी महापालिकेने नेमली समितीसिनेट सदस्याचा पाठपुरावा, विद्यापीठात शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरूअंबाबाई देवीची महिषासूरमर्दिनी रुपात पूजाकोल्हापूर फौंड्री क्लस्टरच्या सभासदासाठी आगामी काळात विविध प्रशिक्षण-चेअरमन दिपक चोरगेकोल्हापुरात चार-पाच ऑक्टोबरला रानभाज्या-सेंद्रिय उत्पादन महोत्सव

जाहिरात

 

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता - क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे

schedule12 Feb 25 person by visibility 415 categoryक्रीडा

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :-  फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. तसेच शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यात, काही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात,असे निर्देश देत गणवेश दर्जा, प्रशिक्षक मानधन, भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय झाला

क्रीडामंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा विभागाचे सहसचिव मंगेश शिंदे, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सहास पाटील, नवनाथ फडतारे उपस्थित होते.

कोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिध्द आहे. याबरोबरच आता फुटबॉल खेळासाठी देखील कोल्हापूर प्रसिध्द होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी असावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीचा, फुटबॉल खेळाडूंचा, फुटबॉल प्रेमींचा आदर करुन कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करत या निर्णयामुळे फूटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून नामवंत खेळाडू घडण्यासाठी ही प्रबोधिनी उपयुक्त ठरेल.

 भरणे म्हणाले, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविणे, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार देणे, अद्ययावत क्रीडा सुविधा देणे त्याचबरोबर क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे स्थापन करण्यात आले आहे. शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे व राज्यातील क्रीडा प्रबोधिनींचे व्यवस्थापन, देखभाल दुरुस्ती, नवीन कामे करताना सूक्ष्म नियोजन करून कामाचा दर्जा, गुणवत्ता कायम राखावी अशी सूचना कली.

कायाकिंग कनोईंग क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीचा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आदेश क्रीडा मंत्री भरणे यांनी दिले. खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भात उपाययोजना कराव्यात. कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes