किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
schedule11 Mar 23 person by visibility 477 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे सामाजिक जाणीवा समृद्ध होतील" असे मत किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष आर.आर.देशपांडे यांनी व्यक्त केले.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रा. सचिन जगताप यांनी बासरी वादनाने करण्यात आली. याप्रसंगी शेती शास्त्रज्ञ संजय पाटील यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार, संदीप तोडकर चोडणकर यांना वसुंधरा मित्र व अवनी या संस्थेस वसुंधरा मित्र 2023 साठी पुरस्कारित करण्यात आले. यामध्ये स्मृतीचिन्ह मानपत्र व झाडाचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वीरेंद्र चित्राव यांनी या चित्रपट महोत्सवाचे परामर्श घेऊन महोत्सवातील सहभागी नागरिक व विशेष करून तरुण वर्ग निश्चितपणे पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडतील असा आशावाद व्यक्त केला.किर्लोस्कर समूहाचे प्लांट हेड चंद्रहास रानडे यांनी या महोत्सवानिमित्त समाजातील विविध घटक एकत्र येऊन विचार मंथनास चालना मिळते.वास्तविक पाहता हा विषय सामूहिक जबाबदारीचा असून किर्लोस्कर उद्योग समूह एक माध्यम म्हणून काम करत आहे या महोत्सवास कोल्हापूरकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. यानंतर किर्लोस्कर कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी धीरज जाधव व सायबर चे संचालक डॉ.एस.पी. रथ यांनी अभिनंदनपर आपले मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद अजगेकर तर आभार डॉ.सुरेश आपटे यांनी केले. कार्यक्रमास डॉ.दीपक भोसले, सुवर्णा भांबुरकर, डॉ.सोनिया राजपूत, डॉ.कालिंदी रानभरे, डॉ.दुर्गेश वळवी, प्रा.महेंद्र जनवाडे, प्रा.शर्वरी काटकर उपस्थित होते.