केदार दिघे कोल्हापुरात म्हणाले, उद्धव ठाकरे हेच आमचे पक्ष अन् चिन्ह !
schedule27 Mar 23 person by visibility 369 categoryराजकीय
शिवाजी पेठेतील फिरंगाई मंदिर जिर्णोद्धारसाठी ५० लाख निधीची घोषणा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यात जे राजकारण घडले ते सगळयांना पाहिले आहे. महाराष्ट्रातील जनता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. आगामी निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आपल्या पक्षाचे चिन्ह समजून निवडणूक लढवूया” असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केले.
ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी पेठेतील फिरंगाईदेवी मंदिर जिर्णोद्धारासाठी ५० लाखांच्या निधीची घोषणा केली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात दिघे बोलत होते. ठाकरे गटाच्या खासदार-आमदारांच्या निधीतून फिरंगाईदेवी मंदिर जिर्णोद्धारसाठी निधी उपलब्ध केल्याचे सांगितले.
रविकिरण इंगवले म्हणाले, “राज्यातील राजकीय घडामोडीनंतर बहुसंख्य कार्यकर्ते हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. अन्यायाविरोधात उठाव करणारी आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची ताकत दाखली जाईल. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना विजयी करण्यात आम्ही महत्वाची भूमिका घेतलाी होती. मात्र क्षीरसागर यांनी मला शहरप्रमुख पदावरुन हटवले. पक्षाच्या वाढीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये.” याप्रसंगी शहरप्रमुख सुनील मोदी यांचेही भाषण झाले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय देवणे, अवधूत साळोखे, तानाजी दळवी, बाजीराव नाईक, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे, चंद्रकांत पाटील, सागर साळोखे, प्रिती क्षीरसागर रावसाहेब इंगवले आदी उपस्थित होते. दरम्यान केदार दिघे यांच्या हस्ते सुधाकर जोशीनगर येथील शिवशक्ती-भीमशक्ती फलकाचे अनावरण करण्यात आले.