Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गग जजकौस्तुभ गावडे बनले शिक्षक आमदार , सहा हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी विजयशिक्षक मतदार संघात कौस्तुभ गावडे आघाडीवर ! पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख फास्ट!!शिक्षक - पदवीधर मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू, प्रत्यक्ष मतमोजणी संध्याकाळनंतरचजीतो कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी राजीव परिख; सचिवपदी रविंद्र देवमारेदुष्काळग्रस्त तालुक्यातील दहावी- बारावी परीक्षार्थींचे शुल्क पूर्णतः माफएआयची साथ मिळाल्याने उपचार पद्धतीत अचूकता- संभाव्य धोके ओळखण्याची क्षमता वाढली सर, तुम्ही सुद्धा...!निवडणुकीपूर्वी ठरावधारकांची सहल, निकालानंतर संचालकांची टूर ! दोन्ही आघाडयांकडून नियोजन !!इकोबाजार, पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शन

जाहिरात

 

कौस्तुभ गावडे बनले शिक्षक आमदार , सहा हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी विजय

schedule28 Oct 26 person by visibility 21 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनने पाठिंबा दिलेले उमेदवार सचिन सानप यांच्यावर सहा हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार जयंत आसगावकर हे चौथ्या स्थानावर राहिले. आसगावकर यांना 8626 इतकी मते मिळाली तर माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना दहा हजार 574 इतकी मते मिळाले ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. दरम्यान मतमोजणीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता भाजपचे कौस्तुभ गावडे व शिवसेनेन पाठिंबा दिलेले सानप यांच्यामध्ये पहिल्या फेरीपासून लढत झाली. शिक्षक मतदारसंघांमध्ये यंदा  विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे,  पंढरपूरचे बी पी रोंगे, डायटचे माजी प्राचार्य आय सी शेख यांच्यासह एकूण 30 उमेदवार रिंगणात होते. शिक्षक मतदार संघामध्ये यंदा निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत महायुतीकडून भाजपतर्फे विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान शिवसेनेने पहिल्यांदा मंगेश चिवटे यांची उमेदवारी जाहीर केली. नंतर त्यांनी उमेदवारी माघार घेतली. तर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सचिन सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवलेले माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनीही हवा निर्माण केली होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत सावंत ते तिसऱ्या स्थानावर राहिले. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर हे रिंगणात होते. आमदार आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षात केलेल्या कामाच्या बळावर शिक्षक मतदारांना सामोरे गेले. मात्र या निवडणुकीत मतदारांनी  त्यांच्या उमेदवारीवर नापसंती दर्शविल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आसगावकर यांना 8624 इतकी मते मिळाली ते चौथ्या क्रमांकावर राहिले.  यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या. काही उमेदवारांच्याकडून लक्ष्मीदर्शन घडवले असा आरोप झाला. दरम्यान पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासूनच भाजपचे गावडे हे आघाडीवर होते. 25 व्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम टिकवली. 25 व्या फेरी अखेर गावडे यांना सतरा हजार 948 इतकी मते तर सचिन सानप यांना 11 तर 658 मते मिळाली. दत्तात्रय सावंत यांना दहा हजार 574 तर आसगावकर यांना 8620 मध्ये आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes