जीतो कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी राजीव परिख; सचिवपदी रविंद्र देवमारे
schedule25 Oct 26 person by visibility 32 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, कोल्हापूर चॅप्टरच्या २०२६-२८ या कालावधीसाठी अध्यक्षपदी राजीव चिनुभाई परिख, तर मुख्य सेक्रेटरीपदी रविंद्र देवमारे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथग्रहण सोहळा मंगळवारी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल सयाजी येथे होणार आहे.
या सोहळ्यास जीतो अॅपेक्सचे संजय डांगी व प्रमोद घोरडिया, संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष रविंद्र खिंवसरा, माजी अध्यक्ष विजय भंडारी, सुजित भटेवरा, अनिल ललवाणी तसेच प्रसिद्ध उद्योजक संजयजी घोडावत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जीतो कोल्हापूर चॅप्टरच्या नूतन व्यवस्थापन समितीमध्ये चेअरमन म्हणून दिलीप ओसवाल व हर्षद दलाल, सेक्रेटरी म्हणून जयकुमार परिख व दिलीप ओसवाल, ट्रेझरर म्हणून प्रतीक ओसवाल, तर जॉइंट ट्रेझरर म्हणून चंद्रकांत ओसवाल यांची निवड झाली आहे. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून अतुल शाह यांचा समावेश आहे.याशिवाय, यूथ विंगच्या चेअरमनपदी पुनीत कोठारी, तर लेडीज विंगच्या चेअरपर्सनपदी स्वीटी पोरवाल यांची निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष रवी संघवी व चीफ सेक्रेटरी अनिल पाटील यांनी मागील दोन वर्षांत कोल्हापूर चॅप्टरच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव करून नूतन कार्यकारिणीकडे नेतृत्वाची सूत्रे सोपविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात जैन समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये जिटो जीवन गौरव पुरस्कारासाठी नेमचंदजी संघवी, जिटो सामाजिक कार्य पुरस्कारासाठी संजय शेटे, जिटो यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी जयकुमार परिख आणि जिटो नवउद्योजक पुरस्कारासाठी उत्पल शाह यांची निवड करण्यात आली आहे.