Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एआयची साथ मिळाल्याने उपचार पद्धतीत अचूकता- संभाव्य धोके ओळखण्याची क्षमता वाढली सर, तुम्ही सुद्धा...!निवडणुकीपूर्वी ठरावधारकांची सहल, निकालानंतर संचालकांची टूर ! दोन्ही आघाडयांकडून नियोजन !!इकोबाजार, पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शनमतदानाचा टक्का वाढला ! शिक्षकसाठी ८५.८७ टक्के, पदवीधरसाठी ६२.७८ टक्के !! नवीन आमदार कोण ?सायबर महाविद्यालयात यंदा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलशिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात डीवाय पाटील अभियांत्रिकीचे विद्यार्थी चमकले पोलंडचे पंतप्रधान लवकरच कोल्हापूरला भेट देणार, युवराज संभाजीराजेंच्यासमोर केली ईच्छा व्यक्तकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडेवालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक,  विभागीय स्पर्धेसाठी निवड

जाहिरात

 

एआयची साथ मिळाल्याने उपचार पद्धतीत अचूकता- संभाव्य धोके ओळखण्याची क्षमता वाढली

schedule25 Oct 26 person by visibility 22 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एआय हे वैज्ञानिक संकट नसून एक संधी आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे पण त्याला एआयची साथ मिळाल्याने उपचार पद्धतीमध्ये त्यात अजून अचूकता आणि संभाव्य धोके ओळखण्याची क्षमता वाढली आहे. जे आपण बघू शकत नाही ते एआय बघू शकते. आणि कोणते उपचार करावे याची संभावना सांगते. त्यामुळे एआय चा फायदा वैद्यकीय क्षेत्रात होत असल्याचे सोलापूरचे नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी सांगितले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित केएमए-कॉन या 
दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेस हॉटेल सयाजी येथे प्रारंभ झाला. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
         
 बेंगळुरू येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर म्हणाले, '  सामान्य माणसाच्या समजुतीच्या पलीकडचा विचार करणारी, रुग्णाला काय होते हे समजून त्याला बरी करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर असते. डॉक्टर हे मार्गदर्शनाच्या भूमिकेत असतात. अहोरात्र रुग्णसेवा करतात. या ताण तणावात आपल्यासाठी वेळ काढत नाही. कोरोनात आपण सगळे लढत होतो.  विकास झाला पण अजून दृष्टिकोन बदलला नाही. अनुभवाची भाषा महत्वाची आहे.  रुग्णाबरोबर डॉक्टरांचे नाते निर्माण झाले पाहिजे.'
   अवघा रंग एक या संकल्पनेवर आधारित ही परिषद असून एक देश एक आरोग्य सेवा असे ब्रीद आहे.असे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ए.बी.पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले .
      यावर्षीच्या परिषदेच्या अध्यक्षा डॉ. गौरी साईप्रसाद यांनी परिषद आयोजनाचा उद्देश विशद केला. त्या म्हणाल्या " सर्व क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही बदल होत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञानाची कोल्हापुरातील सर्व डॉक्टरांना माहिती मिळावी तसेच ज्ञानाची देवाण-घेवाण होण्यासाठी अशा प्रकारची परिषद कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाते. 
    परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.  सचिव डॉ अर्जुन अडनाईक यांनी स्वागत केले.परिषदेस  दिवसभरात गर्भावस्थेपासून बालपणापर्यंत कोणती काळजी घ्यावी,संधिवात, मधुमेहामधील आहार, यकृताचे आजार, राष्ट्रीय अतिदक्षता विभागाचा कोल्हापूरमध्ये विकास, रक्तविकार, मेंदूविकार अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. तसेच केएमए फ्लॅश या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रवीण नाईक, डॉ. सूरज पवार डॉ. दिलीप पाटील, डॉ. आर.एस. पाटील, डॉ. विजय गावडे, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. राजेश पाटील, डॉ. वसंत देशमुख, डॉ राजेंद्र वायचळ, डॉ. सुश्रुत हर्डीकर, डॉ. आर एम. कुलकर्णी,  डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. प्रिया शहा, डॉ. राजेंद्र चिंचणीकार  उपस्थित होते. डॉ.ज्योत्स्ना देशमुख आणि डॉ. अरुण कुमार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes