Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सर, तुम्ही सुद्धा...!निवडणुकीपूर्वी ठरावधारकांची सहल, निकालानंतर संचालकांची टूर ! दोन्ही आघाडयांकडून नियोजन !!इकोबाजार, पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शनमतदानाचा टक्का वाढला ! शिक्षकसाठी ८५.८७ टक्के, पदवीधरसाठी ६२.७८ टक्के !! नवीन आमदार कोण ?सायबर महाविद्यालयात यंदा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलशिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात डीवाय पाटील अभियांत्रिकीचे विद्यार्थी चमकले पोलंडचे पंतप्रधान लवकरच कोल्हापूरला भेट देणार, युवराज संभाजीराजेंच्यासमोर केली ईच्छा व्यक्तकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडेवालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक,  विभागीय स्पर्धेसाठी निवडशिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढा

जाहिरात

 

निवडणुकीपूर्वी ठरावधारकांची सहल, निकालानंतर संचालकांची टूर ! दोन्ही आघाडयांकडून नियोजन !!

schedule24 Oct 26 person by visibility 99 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील सत्तेचे नाट्य निवडणुकीनंतरही कायम आहे. गोकुळ दूध संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी निवडणुकीपूर्वी ठरावधारकांना सहलीवर पाठविले. आता निकालानंतर संचालकांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन दोन्ही आघाड्यांनी केले आहे. गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या. महायुतीला बारा जागेवर समाधान मानावे लागले. गोकुळच्या चेअरमनपदाची निवड २९ ऑक्टोबर रोजी होत आहे. दरम्यान चेअरमनपदाच्या निवडीसाठी चौदा संचालकांची उपस्थिती बंधनकारक असल्याच्या संघाचा पोटनियम असल्याचे पुढे आले आहे. यामुळे चेअरमनपदावरुन नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. चेअरमनपदाच्या निवडी दरम्यान कोणताही घोळ निर्माण होऊ नये यासाठी नेतेमंडळींनी सतर्कता बाळगली आहे. त्या अनुषंगाने संचालकांना टूरवर पाठविले जात आहे.

दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीच्या तेरा संचालकांसह श्री हालसिद्धनाथ महाराजांचे  दर्शन घेतले. गोकुळ दूधसं घाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला मिळालेल्या यशानंतर आज श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ महाराजांच्या समाधीस्थळ येथे जाऊनआशीर्वाद घेतले. गोकुळ दूधसंघ हा कोल्हापूरातील लाखो दूध उत्पादकांचा आधार असून त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देण्यासाठी उर्जा मिळावी अशी प्रार्थना केली. यावेळी नूतन संचालक शशिकांत आनंदराव पाटील (चुयेकर), शशिकांत खोत, राजूबाबा आवळे, अभिजित तायशेटे, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, राहुल बजरंग देसाई, विद्याधर गुरबे, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, श्रीमती अंजना केदारी रेडेकर, भाग्यश्री डोंगळे तसेच सत्यजित दिनकर जाधव, अप्पाचीवाडीचे माजी सरपंच बाबुराव खोत, तानशेंद खोत, गजानन खोत, दिलीप पाटेकर, धनाजी पोटले, कुमार कापसे, आदेश आबने, कुमार खोत, योगेश पोटले, अमर चौगुले, प्रविण माळी आदी उपस्थित होते.

समविचारी आघाडीकडे बहुमत आहे. या आघाडीचे नेते व आमदार पाटील यांनी, निवडणुकीपूर्वीच समविचारी आघाडीची सत्ता आल्यास गोकुळचे चेअरमन म्हणून शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड करणार असल्याचे घोषित केले आहे. दरम्यान काठावरचे बहुमत असल्यामुळे समविचारी आघाडीने संचालकांना टूरवर पाठविले आहे. गोकुळमध्ये महायुतीचे बारा संचालक आहेत. गोकुळ निवडणूक निकालानंतर महायुतीचे नेते मंडळी, विजयी संचालक, पराभूत उमेदवार यांची संयुक्त बैठक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झाली. मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार  विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी आमदार के. पी. घाटगे, संजय घाटगे आदींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. दरम्यान चेअरमन निवडीपूर्वी महायुतीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत भूमिका निश्चित केली जाणार आहे. दरम्यान महायुतीचे संचालकही रविवारपासून सहलीवर जाणार आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes