
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गाव पांढरी , या पांढरीचा प्रमुख घटक असलेला शेतकरी ,त्याची गावपांढरीच्या मातीशी जुळलेली नाळ , रानात मातीत सोने पिकवत असताना बळीराजाची होणारी कुतरओढ़ ,,,आणि तो घेत असलेल्या खस्ता याचे अप्रतिम आणि वस्तुनिष्ठ चित्रण म्हणून प्रा. पी. एस. पाटील यांच्या 'खस्ता' या कादंबरीकड़े पहावे लागेल असे उदगार शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. राजेश पाटील यांनी राधानगरी येथे बोलताना काढले. अथर्व प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रा. पी .एस. पाटील लिखित ' खस्ता' या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूर शहर चिटणीस भाई बाबुराव कदम हे होते. निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आणि कोल्हापूर जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी- कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ मांढरे, राधानगरीचे गटविकास अधिकारी ड़ॉ. संदीप भंडारी, वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक राजेंद्र पाटील -कन्थेवाड़ीकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झालाा. राजेेेश पाटील यानी ही कादंबरी ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी साहित्यकृती असल्याचे सांगितले. कुळव, बांडगे,जोत, नांगरट ,या शब्दवैभवात भर घालणाऱ्या शब्दांसह राधानगरी पंचक्रोशीत असणाऱ्या अनेक दुर्लभ आणि बहुपयोगी वनस्पती ,त्यांची उपयुक्तता आणि दैनंदिन ग्रामीण जीवनात पदोपदी त्यांची सिद्ध होणारी उपयुक्तता खस्ता कादंबरीच्या माध्यमातून जगासमोर येईल ,असे मत व्यक्त केले.विजया पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मधुकर मुसले यानी केले. ययाती पाटील यानी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन लाड, संतोष पाटील, चंद्रशेखर पाटील,प्रकाश कानकेकर आदिनी परिश्रम घेतले .