पत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभ
schedule21 May 26 person by visibility 39 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक, राजकीय समीक्षक व निर्भिड पत्रकार विजय संभाजी चोरमारे यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती भाई माधरावजी बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अड अशोकराव साळुंखे, कार्याध्यक्ष टी.एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची माहिती दिली.
गुरुवारी २८ मे २०२६ रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृती चिन्ह, रोख पाच हजार रुपये, माधवराव बागल चरित्र प्रत असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांना १९९२ पासून दरवर्षी पुरस्काराचे वितरण केले जाते.
गुरुवारी २८ मे रोजी भाई माधवराव बागल यांची १३० वी जयंती आहे. शाहू मिल चौकातील भाई बागल यांच्या पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता भाई माधवराव बागल पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजय चोरमारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.डॉ. चोरमारे यांचा वृत्तपत्रसृष्टीतील प्रदीर्घ अनुभव असून ते चौफेर लिखान करत आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या विषयांवर त्यांनी सडेतोड लिखाण केले आहे. विविध दैनिकात काम केले आहे. त्यांची विविध विषयावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून ते साहित्यिक क्षेत्रात सक्रिय आहेत. पत्रकार परिषदेवळी बागल विद्यापीठाचे सदस्य कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनिल घाटगे, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते.