Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज धधधपदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटीलजज डडजगगन घघघआमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटीलमाझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालटजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची रविवारी सभा, संस्थेला तीन कोटी साठ लाख रुपयांचा नफाकृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठाकोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे

जाहिरात

 

डॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू

schedule21 May 26 person by visibility 3114 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर के कामत यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपताी जिष्णू देव वर्मा यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात घोषणा झाली. कुलगुरुपदासाठी राज्यभवन येथे गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी मुलाखती झाल्या. कुलगुरुपदासाठी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू पी. एस. पाटील, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, नागपूर विद्यापीठातील डॉ. स्मिता देशमुख आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाती पदार्थविज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय ढोले यांच्या मुलाखती झाल्या. या मुलाखती प्रक्रियेनंत कुलपती कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरुंची नियुक्ती जाहीर करण्यात आली. कामत हे शिवाजी विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू ठरले. यापूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठात अधिकार मंडळावरही काम केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. तसेच तंत्रज्ञान विभागातही त्यांनी काम केले आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुपद गेली नऊ महिने  रिक्त आहे. तत्कालिन कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कालावधी सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांच्याकडे सोपविला होता. कुलगुरू शोध निवड समितीतर्फे कुलगुरुपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. २३ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ११५ जणांनी अर्ज दाखल केले. फेब्रुवारी महिन्यात त्या अर्जांची छाननी झाली. त्यातून समितीने २८ उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली आहेत. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती तीन व चार एप्रिल २०२६ रोजी झाल्या होत्या. कुलपती कार्यालयाकडून कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी ११ मे रोजी पाच जणांना कळविले होते. त्यानुसार १४ मे सकाळी ११ वाजल्यापासून मुलाखती झाल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes