जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभ
schedule21 May 26 person by visibility 81 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालयाच्या पंधरा म्घ्े २०१४ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद कोल्हापूरकडील जिल्हास्तरावरील सामान्य प्रशासन, वित्त, महिला व बाल कल्याण विभाग, पशुसंवर्धन या विभागाकडील बदली प्रक्रिया राबविण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाकडील विनंती बदली 2 आपसी बदली दोन अशा एकूण चार बदल्या झाल्या. तर वित्त विभागाकडील सहा लेखाधिकारी सर्व पदे भरलेने एकही बदली झाली नाही. महिला बाल कल्याण विभागकडील विनंती बदली चार व आपसी एक मिळून पाच बदल्या झाल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाकडील प्रशासकीय बदली दोन व विनंती बदली एक अशा एकूण तीन बदल्या झाल्या. बदली प्रक्रियेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारीआतुल आकुर्डे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर उपस्थित होते. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना ३१ मे २०२६ रोजी कार्यमुक्त केले जाणार आहे. बांधकाम विभागाकडील बदली प्रक्रिया २२ मे रोजी तर आरोग्य विभागाकडील बदली प्रक्रिया येत्या २७ मे रोजी आहे.