सांगली क्रेडाईच्या अध्यक्षपदी जयराज सगरे, उपाध्यक्षपदी राजेश गंगवाणी, सुनील कोकीतकर आनंदराव माळी
schedule19 Mar 23 person by visibility 636 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : बांधकाम व्यवसायिकांची सांगली जिल्ह्यातील शिखर संस्था असलेल्या क्रेडाई सांगलीच्या अध्यक्षपदी जयराज सगरे, उपाध्यक्षपदी राजेश गंगवानी, सुनील कोकितकर, आनंदराव माळी तर खजिनदारपदी इम्रान मुल्ला यांची निवड झाली. क्रेडाई सांगलीच्या संचालक मंडळाच्या सभेत २०२३-२०२५ या कालावधीसाठी कार्यकारणी निवडण्यात आली आहे.
क्रेडाईच्या सचिवपदी दिलीप पाटील, सहसचिवपदी धवल शहा, सहखजिनदार म्हणून रोहन पाटील तर समन्वयकपदी उत्तम मार्ग यांची निवड झाली. संचालक म्हणून सुनील मानकापुरे अजित घासाशी सुरेश केली पाने व राहुल घारगे यांची निवड झाली आहे. क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. क्रेडाईचे ज्येष्ठ सभासद अनिल कोकीतकर, विकास कुलकर्णी, प्रमोद शिंदे, अरुण शहा, चिदंबर कोटीभास्कर, निलेश अग्रवाल, विनायक गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या.